top of page
Search

झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?  शरीरातील जैविक घड्याळ म्हणजे काय ??

  • drprafullpatil
  • Dec 31, 2017
  • 3 min read

झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ? झोप (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का ? असे ऐकीवात आहे की "लवकर नीजे लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे " हे किती खरे आहे?

ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही चालणार का ? चला पाहूया....

खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.

रात्री 11 ते पहाटे 3 या कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात(Liver) रोखलेली असते.तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची (Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते. तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या रात्री 11 ते पहाटे 3 च्या वेळेत होत असते. तथापि जर तुम्ही ह्या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही. . जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण 4 तासांचा वेळ मिळतो. . जर 12 वाजता झोपलात तर 3 तास . जर 1 वाजता झोपलात तर 2 तास . आणि जर 2 वाजता झोपलात तर फक्त 1 तास तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी..... आणि जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर ? दुर्दैवाने तुमच्या शरीराकडे खरेतर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ नाही. जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात कालानुक्रमे वाढत जातील.. आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल ? काय होते जेव्हा तुम्ही ऊशिरा झोपता आणि ऊशिरा ऊठता ? ऊशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का ? तुम्ही रात्रभर कीतीही तास झोपला तरी सकाळी खुप थकल्यासारखे वाटले असेल ? ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता. पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते. ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे ? खरेतर, तुम्ही शारिरीक हलचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋण भाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते. सकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ द्या. तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा. सकाळी 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते. असा आहे तुमचा दिवस ऊत्तम प्रकारे सुरु करण्याचा राजमार्ग.... अश्याप्रकारे ह्या आदर्श पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस आरंभ करा. निद्रावस्थेत विषद्रव्ये निष्कासीत केल्यानंतर तुम्ही श्वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा सामावून घेण्यासाठी ताजेतवाने होऊन ऊठा. त्यानंतर तुम्ही मोठया आतड्यातील मैला बाहेर टाकून द्या. आणि त्यानंतर तुम्ही नवीन दिवसाच्या नव्या सुरवातीला आवश्यक तो पोषणयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्या. ह्यात काहीच आश्चर्य नाही की ग्रामिण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे सदृढ असतात. ते लवकर झोपून लवकर ऊठतात. ते त्यांचे शरीरीचे नैसर्गिक जैविक घड्याळ पाळतात. शहरात रहात असताना आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड जाते. आपल्याकडे चांगला विद्युत प्रकाश , टी व्ही , आणि ईंटरनेट असल्यामुळे आपण आपली अमुल्य अशी झोपेची वेळ पाळत नाही. आपले नैसर्गिक वेळापत्रक पाळताना.... एकदा मला माझ्या शरीरातील जैविक घड्याळाची माहीती मिळाल्यावर मी ते पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन. जर मी लवकर ऊठलो तर जरी माझा दिवस नेहमीप्रमाणे कंप्युटर वर चालू

झाला आणि मला घड्याळात 7 वाजलेले दिसले तर मला माहीत आहे की ही नाश्त्याची सर्वोत्तम वेळ आहे. तर मी माझा नाश्ताआहार शरीराद्वारे ऊत्तम प्रकारे शोषण करण्यासाठी 9 च्या वेळेआधी करण्याचा प्रयत्न करीन. जर तुम्हाला कुणी रात्रपाळीची नोकरी देऊ केली तर ? मी तुम्हाला जरी जास्त पगार दिला तरी नोकरी नाकारण्याचा सल्ला देईन. दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारींवर खर्च करावे लागतील. ह्याप्रकारे जास्तीत जास्त ह्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे दैनंदीन वेळापत्रक असे तयार करा. मला खात्री आहे तुम्ही संपुर्ण दिवस अधिक उत्साही आणि ताजेतवाने रहाल.

Comments


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • Google+ Basic Square
bottom of page