विरुद्ध आहार (Part 1)
- drprafullpatil
- May 6, 2018
- 2 min read

विरुद्ध आहार
आयुर्वेदात विरुद्ध आहाराचे फार सुंदर वर्णन केले आहे . विरुद्ध आहार वर्ज्य सांगितला आहे . भिन्न गुण धर्मा च्या गोष्टी एकत्र खाऊ नयेत . दुध आणि फळ एकत्र खाऊ नयेत , फ्रुट सलाड , milkshakes सर्व या प्रकारात मोडतात . मध गरम करून वा गरम पाण्या सोबत घेऊ नये अशा रितीने विरुद्ध आहाराचे १८ प्रकार आयुर्वेदात सांगितले आहेत , देश विरुद्ध म्हणजे आपल्या हवामानाशी विसंगत , काल विरुद्ध म्हणजे थंडीच्या दिवसात ice cream खाणे , संस्कार विरुद्ध , ई . आणि असा विरुद्ध आहार केल्या मुळे कोणते आजार होतात याची यादीच ग्रंथांमध्ये दिलेली आहे मधुमेह , त्वचाविकार ,आम्लपित्त , नपुन्सकत्व ,पांडू (Anemia) , Cancer, Blood Presser, जन्म जात व्यंग आशी मोठी यादी आहे हे सर्व पहिल्या वर आपल्या लक्षात येईल कि या सर्व रोगांचे प्रमाण सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर का वाढत आहे .
आपले आरोग्य हे आपल्या खाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे दिवसभरात पदार्थांची निवड करताना आपण थोडे दक्ष राहणे आवश्यक आहे. कारण आपण खात असलेल्या पदार्थांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे एकापाठोपाठ एक अतिखाल्ल्यास किंवा विरुदध जातीचे पदार्थ खाल्ल्यास शरीरावर घातक परिणाम होतो. यालाच आयुर्वेदात ‘ विरुद्ध आहार’ म्हणतात.
विरुद्ध आहार घेतल्यानं शरीराची होते हानी, जाणून घ्या विरुद्ध आहाराविषयी
शरीरस्वास्थ्यासाठी संतुलित आहार अत्यंत गरजेचा आहे. शरिराची झालेली झीज ही आहारतून मिळणाऱ्या पोषणामुळेच भरुन निघते. मात्र काही चुकीच्या गोष्टींच्या सेवनामुळे शरीराची हानी होते. आयुर्वेदात विरुद्ध आहार ही संकल्पना आहे. काही पदार्थांचं सोबत सेवन केल्यामुळे अनेक व्याधींची लागण होण्याची शक्यता असते. वेगवेगळे खाल्ल्यास हे पदार्थ अत्यंत पौष्टिक असतात. पण त्यांचं एकत्रितरित्या सेवन टाळायला हवं. या पदार्थांच्या प्रतिकूल संयोगानं काही विशिष्ट द्रव्य निर्माण होतात. ही द्रव्य शरीराचे घटक बनू शकत नाहित. शरीर यांना आत्मसात करु शकत नाही. विरुद्ध आहाराच्या परिणामस्वरुपी, गजकर्ण, कोड, सोरायसिस किंवा महारोगाची बाधा होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया आयुर्वेदानं सांगितलेला विरुद्ध आहार
दूध हे पूर्ण अन्न मानले जाते. त्यामुळे अनेकजण मधल्या वेळेत लागणारी भूक मिटवण्यासाठी दूध पितात. परंतू त्याच्या सोबत काही चुकीचे पदार्थ खाल्ल्यास शरीरात आम निर्मिती होते. हे विषसमान असल्याने अनेकदा आपले आरोग्य बिघडते.
दूध आणि फळं –

मिल्कशेक किंवा फ्रुट सॅलेड हे चवीला स्वादिष्ट असले तरीही आयुर्वेदात दूध आणि फळं हा विरूद्ध आहार मानला जातो. आंबट फळ दूधासोबत खाणे टाळावीत. फ्रूट सॅलड, मिल्क शेक किंवा केळ्याचं शिकरण सगळ्यांचेच आवडते पदार्थ आहेत. मात्र दुध आणि फळ्यांचं एकत्र सेवन करणं शरिरासाठी घातक ठरु शकतं. यामुळे त्वचेचे अनेक रोग संभवतात
दूध आणि मसाला –
चमचमीत पदार्थांमध्ये ग्रेवी वाढवण्यासाठी अनेकदा दुधाचा वापर केला जातो. पण यामुळे शरीरात दोषनिर्मिती होते. म्हणून मसालेदार पदार्थांसोबत दूध पिणे टाळा.
दूध आणि मांसाहार –
मासे, चिकन, मटण यांसोबत दूध पिणे टाळा. मांसाहार हा उष्ण असतो तर दूध हे थंड असल्याने शरीरात दुधातील प्रोटीन व मांसाहार यांमध्ये रिअॅक्शन होऊन शरीरात दोष निर्माण होतात.
दूध आणि मीठ
दुध आणि मिठाच्या संयोगामुळे रक्तदोष निर्माण होण्याची शक्यता असते. याशिवाय हाडं आणि मज्जासंस्थावर याचा परिणाम होतो. यामुळे सांध्यांना सूज येणे, नजर कमजोर होणे, शुक्रधातू क्षीण होणे यांसारखे आजार होऊ शकतात.
साजूक तूप आणि मध

या दोन्ही पदार्थांच समप्रमाणात सेवन कधीही करु नये. यामुळे दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता असते.
मध आणि गरम पाणी
मधामुळे आणि गरम पाण्यामुळे वजन कमी होतं. मात्र मध आणि गरम पाणी यांचं एकत्र सेवन केल्यास त्वचेचे दोष उद्भवण्याची शक्यता असते. याशिवाय दृष्टीदोषही उद्भवू शकतो. वजन वाढू नये म्हणून गरम कॉफीमध्ये साखरेऐवजी मध घालून पिण्याची प्रथा प्रचलित झाली आहे. मात्र ही गोष्ट शरीरासाठी हानीकारक आहे.
Comments